(झोडल्यानंतर )

कशाला दत्तकांच्या वाढदिवशी सोहळे आता?
पुऱ्या वर्षात अडचण एक, यांचे सोवळे आता

किडे जगतात पडलेल्या कणांना चावुनी येथे
'शिकारी मीच मुर्गीचा' म्हणाया मोकळे आता

ढगांच्या तापमानाचा चढे पारा कशाने रे?
बिचारे वाट पाही की 'गळे आता, गळे आता'

स्वतःची बायको ना हातही ठेवून घेते अन
कुणी शेजारची पाहून म्हातारा चळे आता

'किती दिवसात काहीही कसे नाही मला सुचले?'
अरे कुंथा विडंबन, आणखी कुंथा बळे आता

'कुणाचे पोट वाढे, मद्यपी कोणी, बुरा कोणी'
विनोदाची उडी यांची बघोनी मळमळे आता

नका छेडू, विडंबन आमचे मुस्काडही फोडे
कवी, प्रतिभा, बिरूदे सोडुनी कोणी पळे आता