नवी सिस्टीम वाजत गाजत
माझ्या दारी आली
मी म्हणालो. 'म्हणजे काय'?
सर्वजण हसू लागले
कुत्सित नजरेने
मग नेते म्हणाले .
'अरे त्याला सामिल करून घ्या,
----तितुका मेळवावा'.
मग त्यांनी जबरदस्तीने
वर्षानुवर्षांच्या संस्कारांची
चीरफाड करून
माझे अंग उघडे केले.
म्हणाले, 'आजपासून तू आमच्यातलाच,
पाणी,लोणी,नोकरी,छोकरी,दवा दारू
सारेच फुकट '.
मग नेते म्हणाले, 'तू फक्त दोन कोट आण'.
बाजूला पडलेला कोट दाखवून म्हणालो
'माझ्याजवळ फक्त एकच कोट आहे.
पाहिजे तर शिवीन दुसरा',
नेते म्हणाले 'अरे, छन, छन रुपये,
तुझे कोट कामाचे नाहीत ,
विचार कर . '
मी सिस्टीमला रामराम केला
घरची वीकटीक केली, घरही फुंकले
तेव्हा कुठे हजार मिळाले.
त्यांच्यामागे धावलो, आणी पॅसे दिले.
पॅसे खिशात घालून नेते म्हणाले,
'अरे नागड्या माणसाचे काम नाही,
चल नीघ येथून '.
मग सर्वचजण माझ्यावर थुंकले
"थू, थू, थू"
मला पण राग आला
म्हंटले, 'पॅशासाठी भीक मागता
म्हणजे तुम्ही पण नागडेच
कपडे घालूनही पब्लिकमध्ये
नंगानाच करता'
माझ्याकडे दुर्लक्ष करून
माझेच पॅसे खिशात घालून
वाजत गाजत निघून गेले.
नवी सिस्टीम आली
मलाच नागवे करून गेली.