(पावसाळी)

प्रेरणास्त्रोत :- श्री. सतिश वाघमाऱ्यांची 'पावसाळी'

खिसे दोन्ही फाटलेले, रोज घेतो सांजवेळी

शुष्क ओठ अन घसा कोरडा कसा, आज (सकाळी) सकाळी

'कोरडा दिवस' (ड्राय डे) गेला, ही कुठे तक्रार आहे ?

कैक होत्या सजविल्या, चिंब रात्री पावसाळी

देशी-विदेशी मद्य सारे, ढोसताना - प्राशताना

ओढ लावीती घराची, दोन डोळे पावसाळी

फुकटे दोघे (तिघे) सोबतीला, बोलका पाऊस होता

आज तो जल्लोष ना, संपला 'रोकडा' कसा अवकाळी' ?

काय हा 'हेमंत' वेडा ? 'पाडतो' विडंबने तो

विडंबिली कैसी ? सांगा गडे, 'वाघमाऱ्यांची' ही एक 'पावसाळी'