(तो पावसाळा)

प्रेरणास्त्रोत :- जयंता५२ यांची कविता 'तो पावसाळा'

तुला आठवतो का तो पावसाळा ?

ज्यात आपल्या छत्र्यांची अदलाबदल झाली होती

मी माझी मोडकी छत्री दुरुस्त करण्यासाठी तुझ्या

दुकानात आली होती........

तू माझी मोडकी छत्री दुरुस्त तर केली नाहीसच

आणि वर मलाच ठेवून (? ) घेतलंस....!!

मग त्यानंतरचे कित्येक पावसाळे

आपण भिजायला बाहेर पडलोच नाही

कारण.....

आपलं छत्री दुरुस्तीच दुकान आता

आपण दोघे मिळून सांभाळतोय ना .........!!!!