"यार सम्या कंटाळा आला! चल रे अभ्या, एक चहा आणि सिगारेट मारू!! "
"रित्या तू आणि अभ्या जा. मी नाही येणार. मला कंटाळा आलाय."
"मी पण नाही येत. तू एकटाच ये जाऊन. मला परत राउंड मारायचा आहे. वरची म्हातारी क्रिटीकल आहे. नर्स बोलावयाला आली तर मला जावं लागेल."
"मला एकट्याला जायचा कंटाळा आलाय. "
"स्साला फेकतो.म्हणे कंटाळा आला आहे. कंटाळा आला आहे की घाबरलास?"
"मी कशाला घाबरू? "
"पिंपळाच्या झाडा खालून जायला. "
"ह्या त्यात काय येव्हढ. काय कधी गेलो नाही का? "
"रीत्या बोलू नकोस. १५ दिवसापूर्वी तो मॉर्च्यूरीचा रखवालदार त्या झाडाला लटकलेला सापडल्यानंतर तू कधी रात्री एकटा सिगरेट प्यायला गेलेला नाहीयेस."
"अभ्या साल्या तू काय शूर आहेस होय? नावात नुसतं अभय. ४ नंबरच्या वॉर्ड समोर मॉर्च्यूरी लागते म्हणून राउंडला मला घेऊन गेला होतास."
"पोरांनो भांडू नका. आपण जाऊया. "
"सम्या चूप, तू साल्या आग लावलीस. तू पण घाबरट आहेस. "
"ठीक आहे. आपण सगळे आपापलं शौर्य सिद्ध करू. "
"सम्या तुझा काय प्लॅन आहे?"
"सगळ्यांनी एकेक करून पिंपळाच्या झाडा खालून जायचं. "
"बकवास. त्यात काय येव्हढ? जाऊ की!!! "
"ए तुम्ही जा. मला नाही यायचं. "
"म्हटलं ना!! नाव नुसतं अभय आहे. बाकी एक नंबर घाबरट. "
"रीत्या, घाबरट-बिबरट नाहीये. मला राउंडला जायचं आहे. परत तो खडूस डॉ. जोशी आला तर माझी बिनपाण्याने करायचा."
"घाबरट!!! "
"घाबरला रे घाबरला!! "
"चूप!! तुम्हाला काय कुठे शौर्य सिद्ध करायचं आहे ते हॉस्पिटल मध्ये करा. "
"ह्या हॉस्पिटल मध्ये काय करणार? "
"हम्म!!! "
"आयडीआ!!! "
"काय रे सम्या? "
"हे बघ, सगळ्यांनी आपलं शौर्य सिद्ध करायला माझ्या कडे एक प्लॅन आहे. ते पण हॉस्पिटल मध्ये राहून. "
"ते कसं? "
"सांगतो. हे बघ. आपल्या पैकी एकाने मॉर्चूरीत जायचं आणि बॉडीज मोजायच्या. "
"मग? "
"जितक्या बॉडीज असतील तितके फुलं दुसऱ्याने आत न्यायचे, आणि प्रत्येक बॉडीच्या पायाशी ठेवायचे."
"आणि साल्या तिसऱ्याने काय करायचं? दोघांना शौर्य्पदक द्यायचं का?"
"नाही!! तिसरा ते गोळा करून येईल. "
"इंटरेस्टिंग प्लॅन. "
"हम्म!! "
"अजून इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आज अमावस्या आहे. "
"चूप फेकू नकोस. "
"सीरियसली!!! तुला माहीत आहे मी चतुर्थी करतो. आजच कॅलेंडर बघितलं."
"खरंच?? बापरे!!! "
"रीत्या, तू अजून विड्रॉ करू शकतो!!! "
"गपे, अभ्या तसं करेल, राउंड च्या नावा खाली. "
"ह्याट. मी तयार आहे!!!"
"ठीक आहे. देन एव्हरी बडी रेडी?? "
"डन!!"
"डन!! "
"गुड!!"
"हे बघ, आत्ता ११ वाजले आहेत. मी १२ पर्यंत राउंड आटोपून येतो. मग आपण सुरू करू. "
"ओके!! "
"ओके!! नाही तरी भुतं १२ लाच जागी होतात!!!"
"हे हे हे!!! "
(क्रमशः)