बेभान

मला नाही जमत तुझ्यासारखं  वागणं

या पावसासारखं बेभान होऊन जगणं

तरीही तुझ्या ओढीने होऊ देते  स्वतःला बेभान...शब्दांच्या चित्रात 

पाऊस अखंड कोसळत असतो.. बाहेर... कागदावर

हळूहळू ओसरणाऱ्या पावसाबरोबर

मला बेभान करणार शब्दचित्रही  पुसट होत जातं...तुझ्यासारखच.....

बाहेर...कागदावर... थांबलेला पाऊस मला सांगत असतो

शेवटी तुला नाहीच जमत त्याच्यासारखं वागणं