म्युचल फंडा बाबत माहिती देणारे संकेतस्थळ सुधारणे साठी मदतिचे आवाहन

म्युचल फंडाबाबत विस्तॄत माहिती देणारे मराठीमध्ये कोणतेही संकेतस्थळ न आढळल्यामुळे प्रथमतः मी एक साधेसे संकेतस्थळ www.mutualfundconsultantindia.com या नावाने तयार केले व ते १ जुलै २००९ रोजी प्रकाशीत केले तेव्हापासून सुमारे १४०० लोके ते पाहून गेले व काहींनी संपर्क साधून प्रतिक्रियाही कळविल्या॥  

आता मी तेच संकेतस्थळ ड्रुपलचे साहाय्याने अद्यावत करत आहे ज्यामध्ये नोंदणी करणे, थेट प्रतिक्रिया प्रसिद्ध करणे इत्यादी सुविधा उपलब्ध असतील॥
सद्याचे संकेतस्थळ पाहून नवीनं संकेतस्थळात काय सुधारणा कराव्यात हे जर कोणी मला मार्गदर्शन केले तर मी त्याचा आभारी राहीन॥