त्या वळणावर.

प्रवास माझा तुझा, असा विरुद्ध दिशांना,
तरिही मी जाताना अन तू येताना,
गाठ पडतेच... त्या वळणावर.

पण, आज तू विसरलायस छत्री?
प्रश्न आणि काळजी...दोघांची गर्दी जमते मनात.
तुला छत्री देण्यासाठी,
माझी मुठ पुढे जाते.. अंधुकसी...
लाखदा मनात असुनही,
शेवटी धीर झालाच नाही.

तू पाहतोस हसून,
जणू वाचलेला असतोस तू,
माझा चेहरा, माझं मन.
"काळजी नको" निश्बदच सांगतोस...पुन्हा हसून.

पुन्हा प्रवास सुरू होतो विरुद्ध दिशांना.
तेव्हा हळूच मी पाहते वळून,
तू भिजलेला अन मी कोरडी..
त्या वळणावर..