निसर्ग हा, ह्या दऱ्या गे खुणावितात तुला

निसर्ग हा, ह्या दऱ्या गे खुणावितात तुला॥
हाका या नीरवतेच्या खुणावितात तुला॥ध्रु॥

तुझ्या बटांच्या सुवासाचे दान घेण्याला
या मेघमाला झुकुनी खुणावितात तुला ॥१॥..
निसर्ग हा, ह्या दऱ्या गे खुणावितात तुला॥

सुवर्णचाफ्यापरी पाहुनी गे पाय तुझे
या व्रात्य द्वाड नद्याही खुणावितात तुला ॥२॥..
निसर्ग हा, ह्या दऱ्या गे खुणावितात तुला॥

न ऐक माझे घे यांचे तरी ऐकूनी
हरेक मनाच्या सदिच्छा खुणावितात तुला ॥३॥..
निसर्ग हा, ह्या दऱ्या गे खुणावितात तुला॥

निसर्ग हा, ह्या दऱ्या गे खुणावितात तुला॥
हाका या नीरवतेच्या खुणावितात तुला॥ध्रु॥

कृष्णकुमार द. जोशी

(ध्रुवपदाच्या ओळी नंतर उघड करण्यात येतील. : प्रशासक)