लांबणारा तमाशा...!

लागते सोडायला जे आपल्याला भोवते
लागते सांगायला, "ते या जगाला भोवते"

एवढे मोकाट सुटणे चांगले नाही म्हणा
आपले व्यक्तित्व पाहूया कुणाला भोवते?

कालची चिंता कशाला आजच्या चिंतेपुढे ?
एकटा मी, वागणे ज्याचे उद्याला भोवते

(काव्य) लेखनाची नाळ आता पाहिजे तोडायला
त्यागुदे सारे मला जे जे तुम्हाला भोवते

जा हवे तेथे, तमाशा लांबणारा तोच तो
हीच चर्चा-कैद मित्रा, आणि 'जाला' भोवते !

वल्गनेच्या वल्गना की खोड अज्ञातातली?
काय असते नेमके जे लेखकाला भोवते ?

मी तुम्हावर सोडले आहे  'हसायाचे न वा'
हासणेही येथ आता हासणाऱ्या भोवते !