जंगले आहेत सुंदर, गुढ आणि घनदाट

दुवा क्र. १

हिमाच्छादित संध्याकाळी जंगलाशी थांबणे
- रॉबर्ट फ्रॉस्ट

मला वाटते मला माहित आहे, ही कोणाची झाडे आहेत.
जरी त्याचे घर गावामध्ये आहे,
बर्फाच्छादित झालेली त्याची झाडे पाहण्यासाठी
इथे थांबलेल्या मला तो पाहू शकणार नाही.

जवळपास कोणतीही झोपडी नसताना असे थांबणे
माझ्या शिंगराला हे नक्कीच तऱ्हेवाईक वाटेल,
(कारण) झाडी आणि गोठलेल्या तळ्याच्या मध्ये
ती संध्याकाळ आहे वर्षभरातील सर्वाधिक धुकटलेली.    

काही घोटाळा आहे का असे विचारण्यासाठी
ते खोगीराला जडवलेल्या घंटेला हलकेच झटका देते.
अन्य एकच आवाज सर्वत्र पसरलेला असतो, तो म्हणजे
हलक्या वाऱ्याचा आणि खाली तरंगत येणाऱ्या हिमपुंजक्यांचा.  

ही जंगले आहेत सुंदर, गुढ आणि घनदाट
पण मला काही वचने पाळायची आहेत
आणि मैलोगणती जायचे आहे मी (काळ)झोप घेण्यापूर्वी
आणि मैलोगणती जायचे आहे मी (काळ)झोप घेण्यापूर्वी....

दुवा क्र. १

दुवा क्र. २