मी

बऱ्याच वेळा असं घडतं,

तू समोर असतेस

अगदी समोर...

आणि... मग

          मनाचा संयम सुटतो

          भावना दाटून येतात,

          डोळ्यांतली आसवं

          गालांवरून ओघळू लागतात...

मला दिसतो...

तुझाचं चेहरा

तू आणि तूच!

          अश्रू गळतात

          अश्रू नव्हे... आनंदाश्रू

          'तू' मिळाल्याचं

          परिपूर्ण समाधान

वाटतं...

स्पर्श करावा तुला...

तुझा चेहरा

दोन्ही हातांनी

अलगत... अगदी अलगत

हातात घ्यावा...

मग मी...

आतुरतेने...

अगदी आतुरतेने

हात पुढे करतो.

आणि जाणवतं

तू

तेथे नसतेसच

तो असतो भास

एक आभास!

          - नकळत...

          मन व्यथित होतं

          आणि अश्रू...

          दुःखाश्रू होऊन

          ओघळू लागतात

          गालांवरून थेट जमिनीवर...