शाळा

हळुवार ज्योत पेटावी तश्या आठवणी हळुवार उजळू लागतात. आणि या उजळणाय्रा आठवणित लाकडाचे शांतपणे पहुडलेले बाक उभे राहतात. सगळे कसे शिस्तंबद्ध लयीत  मांडलेले असतात. आणि अचानक ते भरून जातात चिवचिवाट करणाय्रा पिल्लांनी. मग गोंगाटावर नियंत्रण करायला एक पट्टी वर्गात येते. साहजीकच ही पट्टी एकटी नसते. सर कींवा बाईरुपी माणसाच्या हातात ही पट्टी असते.

या शीस्तीचा तेव्हा राग येत असे. पण शिस्तीला आयुश्शात फार महत्त्व आहे हे फार उशीरा ध्यानात येत. पद्धत चुकिची असेल कदाचित पण हेतू मात्र एकच शिस्तिचा. जन गण मन आणि भारत माझा देश आहे हे आपल्याशी तेव्हाच जुळले जातात. आत्ता मॉल मध्ये जन गन मन एकताना आपल्याला त्याचा अर्थ माहित असतो. पन तेव्हा नुसतीच पोपटपंची.

शाळा संपल्याची किणकिण घंटा आणि एकच होऊदोस. हा सुटकेचा आनंद, बालपणीचा अनुभव. त्यातली लय हातात मिळत नाही, आणि शब्दात पकडता येत नाही. ती भावनाच काही और असते. ती मुठीत पकडून ठेवता आली असती तर  आजही ऑफिस सुटल्या वर मी ती भावना अनुभवली असती.

ती एक घाबरवणारी परिस्थिती परत परत येत राहाते. तिचं नाव आहे परीक्शा. या मजेच्या काळात ती एक पारंब्या असलेल्या वडाच्या गत घाबरवत उभी असते. परिक्शा संपेपर्यंत होणारी हुरहुर आणि परिक्शा संपल्यावर पुन्हा एक आगळा अनुभव मोठ्ठ्या सुट्टिच्या आधी वाटणारा. त्या सुट्टीच आणि आंब्याच्या चविचं मिश्रण म्हणजे दुधात साखर घातल्याचा आनंद. कदाचीत हा दुध साखरेचा आनंदही फिका पडावा असा तो आनंद.

शाळेचा रहाटगाडा असा दहावी पर्यंत चालू राहतो. मग वेगळे तरुण जीव जन्म घेतात. त्यांना व्हॉल्यूस येतात, आवडी निवडी येतात. आणि नकळत कधितरी फुटलेले पंख पसरून ते दुर उडून जातात.