दिवस आला मावळतीला

"दिनेर आलो निभे एलो" या रबिंद्रनाथ ठाकूर यांच्या मूळ बंगाली गीताचा मराठी अनुवाद

"दिवस आला मावळतीला"

दिवस आला मावळतीला, सूर्य बुडे बुडे
आकाशी येती मेघ भरून, चंद्रम्याच्या लोभे

मेघावरी मेघ भरे, रंगावरी रंग
मंदिरातील कांस्य घंटा, वाजते ढंग ढंग

वादळी हवेत मला स्मरे, लहानपणीचे गान
पाऊस पडे टापूर टुपूर, नदीला ये उधाण

मूळ बंगाली गीतः

दिनेर आलो निभे एलो

दिनेर आलो निभे एलो, सुज्जी डुबे डुबे
आकाश घिरे, मेघ जुटेछे, चाँदेर लोभे लोभे

मेघेर उपर मेघ करेछे, रंगेर उपर रंग
मंदिरेते काँसर घंटा, बाजलो ढंग ढंग

बादल हावाय मने पडे, छेले बेलार गान
वृष्टी पडे टापूर टुपूर, नदे एलो बान

मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११०५