माझा महाराष्ट्र

असती अनेक राज्ये, संपूर्ण भारतदेशात
प्रिय असे महाराष्ट्र राज्य, माझ्या मनांत
आहेत जाग्रुत पीठे, आई जगदंबेची अशी
नतमस्तक होई जन, त्यांच्यांच पायाशी

अनेक विध रुपात, आहे निसर्ग राज्यात
वाटे झाला अवतीर्ण, भारत या राज्यात
जाग्रुत पांच ज्योतिर्लिंगे, आहे महाराष्ट्रात
पावन होती शिवभक्त, त्यांच्या दर्शनात

मुक्तहस्ते उधळे निसर्ग, सौंदर्य कोकणात
वाढवे सौंदर्य, सागर किनारा, हो निसर्गात
वास्तव्य दत्तात्रयाचे, हो याच महाराष्ट्रात
सोडवी संकटे जन, त्यांच्याच सानिध्यात

आचंबित करेल, बांधकाम हो जलदुर्गाचे
थक्क व्हाल मनी, पाहून शास्त्र मानवाचे
जन्म घेई शिवछत्रपती याच महाराष्ट्रात
अजरामर होई देश, त्यांच्या पराक्रमात

सह्याद्रीची रांग, पसरली असे महाराष्ट्रात
अनेक गड, विसावले, त्याच्याच कुशीत
राष्ट्रीय संत, रामदास, तुकाराम, ज्ञानेश्वर
केला जाग्रुत स्वाभिमान, देशभक्ती, इश्वर

असे अधिष्ठान येथे, विश्वकर्मा परशुरामाचे
तसेच जाग्रुत वास्तव्य, हो अष्टविनायकांचे
अभिमान वाटे मजला, माझ्या महाराष्ट्राचा
करतो लवून सलाम, त्यास मी हो मानाचा