एक गणिती गंमत

ही गणिती गंमत सहज surfing करताना सापडली आणि आवडली म्हणून इथे देत आहे.

कोणताही एक आकडा घ्या. (कितीही मोठा चालेल). आता तो अक्षरात लिहा. त्या आकड्याची अक्षरे मोजा. यातून एक नवा आकडा मिळेल. त्यावर हीच क्रिया पुन्हा करा. असे काही वेळा केल्यानंतर तुम्हाला दोन हा आकडा मिळेल आणि तिथे तुम्ही स्थिर व्हाल. गंमत म्हणजे कोणत्याही अंकापासून सुरुवात केली तरी शेवटी दोनवरच पोचाल.

उदाहरणार्थ:

आपण ३१२७ धरले. तर
३१२७ = तीन हजार एकशे सत्तावीस --> १२
१२ = बारा --> २
२ == दोन --> २ !!!

किंवा

४५१९८ = पंचेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याण्णव --> १५
१५ = पंधरा --> ३
३ = तीन --> २
२ = दोन --> २ !!!

या प्रकारास mathematical blackholes (गणितीय कृष्णविवरे) म्हणतात. असे इतरही काही नियम असतात जे कृष्णविवर गुणधर्म दाखवतात.