नाव घ्या नाव

दिवाकरांचा (सोलापूरच्या दिवाकर बेकरी शी तुमचा काही संबंध आहे का होऽऽ.. सहज चांभार चौकशी.. ) उखाण्यांचा लेख वाचून सहज कल्पना आली की सगळ्या मॅरीड मनोगतीनी आपापल्या जोडीदाराचे नाव घ्यायचे ऑनलाईंनच..

ऑनलाईन का जमाना है भाई !!! घ्या घ्या नाव ..लाजू नका, तसही परक्या देशात उखाणे घ्यायची वेळ सहसा येत नाहीच, पण मायदेशी कोणत्याही कार्यक्रमाला आणि विशेषतः श्रावणात तर अगदी हटकून ही वेळ येतेच.. होय ना.. मला तर लग्नातल्या उखाण्यानंतर एकदम पहिल्या भारत यात्रेलाच उखाणा घ्यायची वेळ आली होती, तेव्हा जाम गडबड उडाली होती... पण आग्रह मात्र जोरदार होता.

आता हे ऑन्लाईन उखाणे कसे एकसे एक हटके पाहिजेत हा!!!

चला तर मग मी श्रीगणेशा करते. माझ्या आयटी तल्या उखाण्याने  

ईश्शऽऽ ..

आपलाच कीबोर्ड आणि आपलाच तर हा माऊस..
समीर रावांचे नाव घेतेय पल्लवी त्यांची स्पाऊस...    

अहो घ्या घ्या तुम्ही नाव  ..  टोटल बिंनधास्त.. लाजताय कसले? गम्मत आहे ही..