संपले माझे सारे आषाढ आणि
ते ठेवणीतले श्रावणही
पण तुझ्या नजरेतला ग्रीष्म सरतच नाही
आणि
आताशा ह्या आभाळाचे वागणेही झालेय तुझ्यासारखेच..
मग
ही आतबाहेरची तलखी असह्य होऊन
शोधली सारी दुकाने.. नव्या प्रार्थनांसाठी.
पण एकही प्रार्थना हमी घेत नाही
एका थेंबाचीही!
मग आता अशा या तप्त,कोरड्या, भेगाळलेल्या परिस्थितीत
काही होऊ शकत असेल तर
फक्त अशा कविता!
आणखी काय?
-------------------------------------------------
जयन्ता५२