बटाट्याचा शिरा

  • ४ मध्यम आकाराचे बटाटे
  • अर्धी वाटी साजूक तूप
  • १ वाटी साखर
  • बदाम आणि काजू काप आवडीनुसार
१५ मिनिटे
२ जणांसाठी

बटाटे कुकर मध्ये उकडून घ्यावे. उकडलेल्या बटाट्याची साले काढून बटाटे किसून घ्यावे. कढईत तूप गरम करावे. त्यात किसलेला बटाट्याचा लगदा टाकावा. गुलाबी होइस्तोवर भाजावे. तूप सुटू लागल्यावर साखर टाकावी. अजून थोड्यावेळ परतावे. नंतर बदाम आणि काजू काप आवडीनुसार घालून गरम गरम वाढावे.

टीपा नाहीत.