नववधू

                    नववधू

काय ग अस? कराव कस ।

काहीच कळत नाही ।

वरण भाताशिवाय काहीच।

कस येत नाही ॥

सकाळी वरण भात।

रात्री भात वरण  ।

समजून घे हे नव्हे ।

नुसते उदर भरण ॥

पोळ्या जमत नाही ।

भाजी येत नाही  ।

तांदूळ, डाळ ते नुसते

कुकरमध्ये घालते ।

त्याला कोणतेही कष्ट नाही।।

एखादेवेळी तर ते ही जमत नाही ।

दिवसभर माझ्या येण्याची ती वाट पाही ॥

माझ्या जवळ मग ती येते ।

मला लाडीकपणे म्हणते ।

गडे! आज आपण हॉटेलमध्ये जेवायला जाऊ ।

आग्रह होतो; माझा नाईलाज होतो ॥

हॉटेलमध्ये मात्र ती मागवते,

भाज्यांचे चार प्रकार व पोळ्यांचे तीन '

भरपेट खाते!

वरण भात मात्र कटाक्षाने मागवण्याचे टाळते ॥

वेटरला बील आणावयास सांगते ।

पाहून बील त्यानेच माझे पोट भरते  ॥

घरी येऊन मग मी तिला सांगतो  ।

आण ते वरण भात ''तेच मी खातो''

अनंत खोंडे.

 २५ ऑगस्ट २००९