ही दोन शिखरे..

      पु.ल.देशपांडे यांचे जयवंत दळवी व जी.ए.कुलकर्णी यांच्याशी असलेलं मैत्र सर्वश्रुत आहे. तद्वतच, विंदा करंदीकर व मंगेश पाडगावकर यांच्याशीही असलेला स्नेह अनेकदा प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे दिसून आलेला आहे. पुलंचे गंगाधर गाडगीळांशी सख्य नसल्याचे पुसट संकेत गाडगीळ गेल्यानंतरच्या एका लेखातून मिळाले.

सारस्वतांमधील पुल या एका शिखराच्या जोडीने वपु या दुसऱ्या शिखराची पुस्तके अजूनही प्रचंड प्रतिसाद मिळवितात.

या दोघांमधील संबंध कसे होते, हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

कोणाला काही माहिती ?