लाल भोपळ्याचे भरीत

  • लाल भोपळा
  • दण्याचे कूट, घट्ट दही
  • कोथिंबीर, कढीलिंब, हिरव्या मिरच्या.
  • साजूक तूप, जिरे
  • साखर, मीठ
२० मिनिटे

१) भोपळ्याच्या फोडी करून कूकर मध्ये शिजवून घ्याव्यात. मग त्यातील पाणी काढून नीट कुस्करून घ्याव्यात. ( हे पाणी नंतर आमटीत वगैरे घालता येते. )

[ ह्या पुढील कृती आयत्यावेळी करावी नाहीतर भरित आंबट होते.]

२) मग त्यात दण्याचे कूट, घट्ट दही, बारिक चिरलेली कोथिंबीर, साखर, मीठ घालून कालवून घ्यावे.

३) तूप गरम करून त्यात जिरे, कढीलिंब, हिरव्या मिरच्यांचे ( लाल पण चालतात आवडीनुसार ) तुकडे घालून ; ही फोडणी वरून द्यावी व पुन्हा कालवून घ्यावे.

दही घट्टच असावे. भोपळ्यातील पाणी नीट काढून  घ्यावे.

सौ. आई