श्रीगणेशोत्सव २००९

पाहाता पाहाता यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवाचा समारोप उद्यावर येऊन ठेपला. या निमित्ताने मनोगतींनी मायबोलीत परापूजा पाहिली, श्रीगणपतीअथर्वशीर्ष पाहिले तसेच मंत्रपुष्पांजलीही वाहिली. श्रीगणेश ही बुद्धीची देवता. मनोगतींकरता या देवतेचे पाठबळ सदैव आहेच. एका स्तवनाने या वर्षीच्या उत्सवाची सांगता करू या -

एकदंत श्रीगजानना । नमो~स्तुते सुंदरवदना ॥धृ॥

दूर्वांकुरप्रिय तूं लंबोदर । चतुर्हस्त ल्यालास् पितांबर ।
पाशांकुश अन् दंतखंडधर । ओंकारस्वरूपी उमानंदना ॥१॥

मूषकध्वज श्रीगणेश तूं । सिद्धिविनायक वक्रतुंड तूं ।
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी । करी वर्षाव कृपेचा तूं ॥

ऋद्धि-सिद्धि सेवेस निरंतर । लक्ष्य लाभ शोभति अंकांवर ।
सत्कर्मचि घडवी अमुच्या हातून । करी सर्वशत्रुविनाश तूं ॥

ईशू विद्येचा अवघ्या तूं । सकल कलांचा उद्गमही तूं ॥
स्मरता तुजला अहर्निश मनी । करी विकास गुणांचा तूं ॥

सर्व सुखांचा कलश सांडवी । दुःखांचा परिनाश करी ।
प्रसन्न मंगल दर्शन देवुनी । दे शांती व्याकूळ मना तूं ॥

॥गणपतिबाप्पा मोरया॥