हसण्याची असुनी संधी..

हसण्याची असुनी संधी
ते सारे रडले होते
मी हासत हासत जगलो
मी दु:ख पचवले होते..

मी हसलो जेव्हा जेव्हा,
ही झाडे बहरत गेली..
मी रडलो तेव्हा तेव्हा,
हे दगड वितलत होते..

मी गगन झुकविता खाली,
जग रंगीन झाले होते..
मग इंद्रधनूने त्याचे,
ते रंग घुसळले होते..

हसण्याची असुनी संधी
ते सारे रडले होते..!\

मी रोज भुपाळी म्हनुनी,
सूर्यास उठवीत होतो..
मी रोज अंगाई गाऊनी,
चंद्रास निजवीत होतो..

देवास कुठे मी म्हटलो,
मज पाठव पृथ्वी वरती..
मी गझल म्हणावी म्हनुनी,
त्यानेच ढकलले होते..

हसण्याची असुनी संधी
ते सारे रडले होते..!

ते सारे रडले होते..!