रंगकर्मी.कॉम

सुप्रभात, रंगकर्मीचा  नमस्कार. नाटक, मराठी जीवनाचा एक अविभाज्य घटक. महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या संगीत नाटके, त्यानंतर पुरषोत्तम दारव्हेकर, वि. वा शिरवाडकर, प्रभाकर पणशीकर, डॉ. श्रीराम लागू, विजय तेंडुलकर आणि आजच्या काळात प्रशांत दामले, भरत जाधव यांची नाटके पाहतच वाढल्या. याशिवाय प्रायोगिक रंगभुमीदेखील सत्यजीत दुबे, चेतन दातार यांमुळे जोरात होती आणि आजही आहे. नाटक हा मराठी मनाला भावणारा विषय असल्याने ही नाट्यचळवळ जोमाने वाढली व गावागावात रंगकर्मी मंडळी तयार झाली. या साऱ्यामुळे नाटक हे मराठी माणसाचे अविभाज्य अंग बनून गेले.

साहजीकच, या साऱ्या रंगकर्मीना व्यक्त व्हायचे होते, त्यांच्यातल्या लेखकाला नाटके, एकांकिका लिहायच्या होत्या. काहीना आपले अनुभव व्यक्त करायचे होते, तर काहीनां आपले अनुभवाचे बोल इतराना सांगायचे होते. त्यामुळे हळुहळू नाटकावर लिहिणाऱ्यांची संख्या वाढू लागली. आजतर आघाडीच्या एक दोन साप्ताहीकात दर आठवड्याला नाटकावर लेख येतो, याशिवाय नाटकाला वाहिलेले त्रैमासिकदेखील आज जोरात चालू आहे. यामुळे नाटक ही गोष्ट सामान्यांपर्यंत पोहोचत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र रंगकर्मींच्या संख्येच्या मानाने हे व्यासपीठ तोकडे आहे, आणि इथे काही ठराविक विभागाचा वरचष्मा असतो असे काहींचे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे ज्याला आपण आजची आणि उद्याची संवादाची भाषा म्हणतो त्या इंटरनेटवर मात्र रंगकर्मींसाठी असे एकही संपुर्ण मराठी संस्थळ नव्हते जीथे त्यांना व्यक्त होता येईल. जगभरातल्या मराठी रंगकर्मींसाठी ते एक माध्यम होईल. याच गोष्टीचा विचार करून आम्ही एक नवे मराठी संस्थळ सुरू करत आहोत. या संस्थळाचे नाव "रंगकर्मी "असे आहे. ते तुम्हाला दुवा क्र. १येथे पाहता येईल.

या संकेतस्थळाचे उद्दिष्ट हे रंगकर्मीना एकत्र आणणे, त्यांना घडणाऱ्या घडामोडींची माहिती देणे आणि त्या सर्वाना व्यक्त होण्यासाठी एक हक्काची जागा उपलब्द्ध करणे हे आहे. या संस्थळावर थेट भेट, स्क्रीप्टींग, नाट्यानुभव, गप्पा, परीक्षण इ विभागाद्वारे रंगकर्मी व्यक्त होऊ शकतात. याशिवाय काही मान्यवरांनीदेखील या संस्थळावर आपले अनुभव शेअर करायचे मान्य केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याशीही लोकाना थेट संवाद साधता येईल. याशिवाय सदर या विभागातून त्या त्या विभागातील दर्दी लोक नाटकाच्या विविध अंगांची लोकाना ओळख करून देतील. सांगायला विशेष अभिमान वाटतो का या संस्थळावर सर्व नवीन आणि उत्तमोत्तम सुविधा देण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे हे संस्थळ युजर फ्रेंडली होईल. कालच कोल्हापुरात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात रंगकर्मी आणि प्रसिद्ध अभिनेते मा. डॉ. गिरिष ओक यांच्या हस्ते या संस्थळाचे उदघाटन झालेले आहे.

मी आपणा सर्वाना हे संस्थळ पाहण्याची विनंती करतो. हे संस्थळ आपल्या सहकार्यानेच चालू राहणार आहे. तेव्हा आपण आपले अभिप्राय जरुर द्या, आपल्याला कुठला लेखक वाचायला आवडेल ते जरुर कळवा. आणि हो आपले लिखाण दुवा क्र. २ वर पाठवायला विसरू नका. ईश्वराच्या कृपेने आणि तुमच्या आशीर्वाद व सहकार्याने हे संस्थळ यशस्वी होवो अशी प्रार्थना करतो.

आपले नम्र,

रंगकर्मी व्यवस्थापन.