काही झालं तरी...
काही झालं तरी एकदम मस्त जगायचं
काहीही झालं तरी एकदम मस्तच जगायचं
अडचणी या येतच राहतात
त्या येण्यासाठीच तर असतात
आत्मविश्वासाने त्यांना सामोरं जायचं
काही झालं तरी एकदम मस्त जगायचं.
अपयश आलं म्हणून खचायचं नाही
थारा देऊन त्याला बरोबर घ्यायचं नाही
नव्या जोमाने पुन्हा उभं रहायचं
काही झालं तरी एकदम मस्त जगायचं.
काळोख जर वेढू लागला मनाला
जागा द्यायची नाही त्याच्या एकाही कणाला
त्याला बाजुला सारून प्रकाशाकडे चालायचं
काही झालं तरी एकदम मस्त जगायचं.
जायची वेळ झाली तरी हसले पाहिजे
ते पाहून मरणही चाट पडले पाहिजे
समाधानी मनाने इथून निघायचं
म्हणूनच काही झालं तरी एकदम मस्त जगायचं
काही झालं तरी एकदम मस्त जगायचं.
...आरती.