हळू हळू 'बेफिकीर' होण्यातली मजाही बरीच आहे

पहाड झाला चढून आता दरीत मारायची मुसंडी
हळूच "मेला" म्हणू नका, वाजवा नगारे, पिटा दवंडी

मधे मधे परवडेल तेव्हा जगायचाही प्रयत्न केला
मिळायच्या भूमिका कशाही, कधी जयद्रथ, कधी शिखंडी

असाच मी एकदा निघालो फिरत फिरत आणि भेटली ती
निवांत मी पोचलो घरी, पोचली त्वरेने घरात कंडी

शहर तुझे माणसे कधीची करून बसली अरण्य त्यांचे
मनात चिमणे जरीतरीची उगाच तू घालतेस अंडी

बुडून मद्यात झिंगताना मधेच आली पुढ्यात माझ्या
नवीन पिल्ले बघून गेली विषण्णशी गावरान हंडी

तुला कधी बोलता न आले, मला कधी बोलता न आले
कुणीच केले नसेल हे प्रेम असले कधी त्रिखंडी

हळू हळू 'बेफिकीर' होण्यातली मजाही बरीच आहे
उबेत नाती फुका मिरवण्याहुनी बरी बेसुमार थंडी