सेव्हन कप स्वीटस!!!

  • बेसन- १ कप
  • ओले खोबरे - १ कप
  • दूध - १ कप
  • तूप -१ कप
  • साखर- ३ कप
  • वेलची पूड - चिमूटभर.
५ मिनिटे
छोट्या वड्या कापल्या तर ४० तरी होतात

वर दिलेले सर्व साहित्य एकत्र करून १ तासभर ठेवावे.

नंतर मंद आचेवर ते शिजवावे. शिजवताना एकसारखे ढवळत राहावे.

एका बाजूला एका ताटाला तूपाचा हात लाऊन ठेवावा.

कढईला जे बाजूनी मिश्रण चिकटलेले असते ते कोरडे पडायला लागले आणि कढईतले मिश्रण घट्ट व्हायला लागले की शिजले असे समजावे.

आणि मग ते मिश्रण त्या ताटात ओतावे. एका जाड प्लास्टिकच्या कागदाला थोडे तूप लाऊन त्याने मिश्रण ताटात पसरावे.

आणि मग थोडेसे थंड झाले की सुरीने हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्या.

हवे तर प्रत्येक वडीवर काजू, मनुका किंवा पिस्त्याने सजवू शकता.

माझी एक वहिनी...