" एका विवाहिताची व्यथा"
आमुच्या लग्नाचे पहिले वर्ष होते।
तेव्हा मला ते स्वर्ग सुख वाटत होते॥
सकाळी सकाळी पत्नीचे चहा घेऊन येणे।
अलगदपणे मला झोपेतून उठविणे॥
अन! लाडिकपणे मला चहा घेताना? म्हणणे।
हळूवारपणे माझ्या केसातून हात फिरविणे॥
ऑफिसला जाण्याची आठवण करून देणे।॥
सर्व कसे स्वप्नवत चालले होते।
आनंदाला नुसते भरते येत होते॥
दिवसभर सतत तिचाच ध्यास असे।
तिची मनमोहक छबी मम ऱ्हिदयी वसे॥
जणू ईश्वराचीच की ती मूर्ती मम भासे॥।
पांच वर्षानंतर
सकाळी सकाळी पत्नीचे हाक मारून ओरडणे।
चहाचा कप टेबलावर आदळून मला उठविणे॥
उठा! चिंटूला ऑफिसला जाताना शाळेत पोहचवा।
त्याला जर उशिर झाला तर,
त्याच्या शिक्षकाला तुम्हीच समजावा ॥
हा पत्नीचा अवतार मला कजागिणीचा भासला।
दिवसभर तिचा कर्कश आवाज कानी घुमत राहिला॥।
आता वाटते देवा कधी यातून होइल सुटका? ।
यापेक्षा मी कुमार होतो तेच बरे नाही का? तेच बरे नाही का. ॥
अनंत खोंडे.
२५सप्टेंबर २००९.