हेमंत

फासले ऐसे भी होंगे, ये कभी सोचा न था...
सामने बैठा था मेरे, लेकीन वो मेरा न था...

आपलं असूनही कुणी आपलं नाही, ही वेदना कुणालाही बेचैन करते. हेमंत राग ही वेदना फार तीव्रतेने व्यक्त करतो. आशा आणि निराशा यातील अवकाश म्हंजे हेमंत! त्यात बेचैनी, व्याकूळता, विरहवेदना आहेच; पण तो येईल कधीतरी... होईलच आपला, हे समाधान आणि आसही त्यात आहे.

हेमंत रागाला व्यक्त करणारी
माझिया प्रियाला प्रीत कळेना... ही फार सुरेख रचना आहे.

दुवा क्र. १

प्रीत कळेना... मधील गंधार, मध्यम आणि धैवतावरून निषादावर उतरणारा स्वर याच मार्गाने परतताना पंचमाला घेऊन पुढे सरकतो. त्यावेळी "कळेना' शब्दाची येणारी प्रचिती केवळ अप्रतिम...
पावसात भिजतो श्रावण... यात "श्रावणा'ला भिजविणारा षडज, रिषभ, मंद्रातील निषाद, मध्यातला गंधार चिंब करतो.
पुढे निषाद आणि तार षडज "आवरू मनाला कैसे... 'मधील व्याकूळता टोकदारपणे व्यक्त करतात...

दुवा क्र. २