एकच आस

मी मोरपीस व्हावे
गालावरी फिरावे,

मी एक फूल व्हावे
केसात नित राहावे,

मी एक झुळुक व्हावे
पदरास झुळझुळावे,

मी एक बोट व्हावे
दातामध्ये रुतावे,

काही जरी मी व्हावे
मजसाठी तू असावे !