एकत्रित योजना..किती फायदेशीर, किती तोट्याच्या ?

विमा, म्युच्युअल फंड आणि मेडिक्लेम या तीन गोष्टी गेल्या काही वर्षांत या तीनही गोष्टींची एकत्रित गुंतवणूक योजना ग्राहकांसमोर ठेवण्यात येत आहेत.
अक्सिस बँकेच्या एका तरुण, चुरचुरीत मुलाकडून बँकेच्या वतीने दिली जाणारी योजना किती 'जबरदस्त' आहे, याचे विवेचन ऐकण्याचा योग आला होता. एकंदरीत त्याने या विषयाचे गुलाबी चित्र निर्माण केले.
या तीनही गुंतवणुकींचे मूळ स्वरुप, कारणे व फायदे निराळे असताना हे थ्री- इन- वन सादर करण्यात कंपनीचा फायदा जास्त की ग्राहकाचा, हा प्रश्न पडला.
याबाबत, अभ्यास असणारी मते द्यावीत.
व्यक्तिगत पातळीवरील अनुभव तर अतिशय वाचनीय होतीलच व मार्गदर्शनही होईल.