अभ्यंगस्नान

षडरिपुंनी झाले होते शरीर मलिन
दिवाळीत केले, मग अभ्यंगस्नान

सुवासिक तेलाने, केले भार्येने मर्दन
जिरवले प्रेमास, मत्सरास झटकून
डोक्यावरून घाले, सचैल ते स्नान
वाहून गेला मोह, गरम पाण्यातून
अंगास लावे हळुच, सुगंधी साबण
धुवून टाके अहंकार, चोळून चोळून
लावले तनुस, मग सुगंधित उटणं
संचारे उत्साह हो, काम जाई पळून
केला जल अभिषेक, मस्तकावरुन
वाहून गेला क्रोध, उष्ण पाण्यातून
मग लपेटे तनुस, कोरड्या रुमालानं
शोषले लोभास, हळुवार करकमलानं