मी 'बेफिकीर' भासवणे खूप महत्त्वाचे आहे

असण्यापेक्षा नसणे खूप महत्त्वाचे आहे
हासण्याहुनी रडणे खूप महत्त्वाचे आहे

'नको, नको' म्हणण्याऱ्यांचे गुणगान विश्व गाते
'हवे असुन' 'सावरणे' खूप महत्त्वाचे आहे

'क्षुद्रांमध्ये' बोल कशाला बोलत बसलो मी?
'कुठे नसावे' कळणे खूप महत्त्वाचे आहे

व्यभिचाराची व्याख्या यारो सोयीवर ठरवा
निसर्गापुढे टिकणे खूप महत्त्वाचे आहे

मी 'बेफिकीर' आहे हे 'ज्याला त्याला' कळलेले
मी 'बेफिकीर' भासवणे खूप महत्त्वाचे आहे