कधी कंपू, कधी वाहवा जगी चुकले न कोणाला

कधी कंपू, कधी वाहवा जगी चुकले न कोणाला
यानेच तरले काही, हेच न जमले कोणाला

किती उध्वस्त झाले या जीवघेण्या प्रतिसादाने
खरडी, व्यनितुनी साधले भांडणे कोणाला

शिकवली रीत येथे जुन्या अन जाणत्यांनी
हुरळून जात कोणी, तर हिरमुसणे कोणाला

हव्यास ऐसा आहे, म्यानात खड्ग असता
कमरेखाली प्रहारे, कधी चेपणे कुणाला

शंभो न चंद्रमाने, केले खुले आखाडे
निद्रिस्त ते सुखाने, भाळी झुंजणे कुणाला

असो विकी, असो अनुभव, संस्कृत वा संस्कृती
अस्तन्या झटकुनी अपुल्या सरसावणे कुणाला

करत उच्चरवाने घोषणा विक्षिप्त असण्याच्या
लज्जास्वरुप जे जे त्यावरिही न लाजणे कुणाला

कोणास प्रश्न 'कोण हा? ' हल्ली इथे न पडतो
आयपीवरून सोपे झाले ओळखणे कुणाला

कविता - विडंबनाचे तसे बरे चालले होते
'संजोप' तळहातीचे दाखव तरी खाजणे कुणाला