धडपड...

अव्यक्ताची व्यक्त होण्यासाठीची धडपड...
मनात... रोमारोमांत...
नव्हे, संपूर्ण 'स्वत्व'च ती धडपड म्हणजे!

गवसलं तर व्यक्त,
नाही तर अव्यक्त...
अस्तित्व मात्र निरंतर!

मन होऊन जातं शून्य
कधी कधी,
तशीच लेखणीत अडून बसते शाई
कधी कधी.
कितीतरी युगांपासून हे चालू आहे,
अजून कितीतरी युगे चालू असेल...
काळाच्या श्वासोच्छ्वासाप्रमाणेच... अनंत!

पुन्हा एकदा आरंभबिंदू गाठून
एक वर्तूळ पूर्ण होण्यासाठी धडपडतंय...
मनात... रोमारोमांत....
आणि लेखणीतही !

- चैतन्य दीक्षित (२०-१०-२००९)