रांगोळी

सारवलेल्या स्वच्छ अशा अंगणात

रेखाटली रांगोळी, सुंदर ती  मजेत
भरले गहिरे रंग, आकर्षक  त्यात
बोलके झाले,  चित्र  कसे  साक्षात
रांगोळीत असे वलयांकृत वेलांट्या
घरातील सुखदुःखाच्या जशा लाटा
रांगोळीत असती अनेक रंग छटा
घरातील लोकांच्या मनातील वाटा
रांगोळी असते,  घराचा हो आरसा
आनंद विलसतो,  त्यात  छानसा
रांगोळी देते हळुच घराचा कानोसा
घरातील आनंदाचा रांगोळी वारसा
असेल रांगोळीत सुंदर रंग संगती
आकर्षित करे लोकांची मने पुरती
कामात असेल घरवाल्यांचीं सहमती
घर करेल निश्चित ते खरी उन्नती