भाऊबंदकी : ठाकरे आणि अंबानी एक तुलना

सध्या दोन भावांचे भांडण हे लोकप्रिय झाले आहे. ठाकरे भाऊ आणि अंबानी बंधु.

१) अंबानी बंधू हे उद्योगपती आहेत. त्यानी आधिच वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि वेगळे होउन वेगळे उद्योग समुहान्च्या मार्फत सक्रिय आहेत. गुंतवणुकदार हे कधिही कुटुंब संचालित उद्योगात पैसे गुंतवण्यास फार उत्सुक नसतात. कारण जर भांडण झाले तर पैसे बुडण्याची भीती असते. ति भीतिची टांगती तलवार अंबानी बंधुनी आधिच काढून घेतलि (वेळिच वेगळे होउन). सबब आता जे भांडण चालू आहे ते फक्त मानापमानाचा प्रयोग चालू आहे. पण एक मात्र निश्चित आहे कि गुंतवणुकदार मात्र याने नाखुष नाहित. दोघेही भाउ समान रुपाने बाजारात गुंतवणुकदार समुदायाच्या आधारे सक्रिय आहेत.

२) याच्या ठिक उलट ठाकरे भाउ मात्र मतदार समुदायान्शी प्रतारणा करून वर एकमेकान्वर चिखलफेक करण्यात समाधानी आहे.

आता या भाऊबंदकिला काय म्हणावे. तुलना करावी तर काय मुद्दे असावे, आपण यात काय शिकू समजू शकतो?