जयदेवा जयदेवा जय गझलकारा

दुर्गुणातुन दुर्गुणी गझला या आणा
जमली नाही तर ती कविता हे जाणा
येता-जाता शब्द सुचले ते हाणा
भरभर टाका आता कवितेचा घाणा
जयदेवा जयदेवा जय गझलकारा
कोपरापासूनी करू नमस्कारा, जयदेवा जयदेवा ॥

अंतर्बाह्य आहेस तू सर्वश्रेष्ठ
अभाग्यासी कैसी कळेल ही गोष्ट
लिहितो गझला म्हणतो कविता हा 'जोक'
पाहिला आहेस रसिकांचा अंत
जयदेवा जयदेवा जय गझलकारा
कोपरापासूनी करू नमस्कारा, जयदेवा जयदेवा ॥

गझला लिहिण्याचा विडा घेतला
इतरांनी साष्टांग प्रणिपात केला
प्रसन्न होउनीया मोठा जाहला
जन्मोजन्मी पीडा देऊन गेला
जयदेवा जयदेवा जय गझलकारा
कोपरापासूनी करू नमस्कारा, जयदेवा जयदेवा ॥

गझला करताना लागले ध्यान
काय लिहिले त्याचे उरले ना भान
मी-तू लिहिल्याने गझलेला मान
'राजे'ला संधी ही पकडाया कान
जयदेवा जयदेवा जय गझलकारा

कोपरापासूनी करू नमस्कारा, जयदेवा जयदेवा ॥