हिला मी तरी हझल म्हणेन
कसे ठकविले जगास साऱ्या नको गर्व हा फुका
नशीब बेणे कधीतरी लावेल तुलाही थुका
खुल्या दिलाने स्वीकारूही तुमची प्रांजळ मते
चुकूनही पण नका दाखवू काव्यामधल्या चुका
जगण्यामध्ये आताशा कसलाच समन्वय नसे
म्हैस पाहिली टीव्हीवरती नाव जिचे नाजुका
पैशापुढे न झुकतो कधिही स्वाभिमान आमुचा
त्यासाठी तर आणा भरुनी डॉलरने संदुका
नवल काय जर तोंडघशी पडलास काल तू पुन्हा
गेलास घ्यायला उंटाच्या टिंब टिंब (... ) चा मुका
जेवण तयार श्रेष्ठी तरिही करेनात वाटणी
किती दिवस उपवास सोसला अता लागल्या भुका
भेकड नेते का दिल्लीचे पाय सदा चाटती?
मायमराठी पुजते आता हिंदीच्या पादुका