वेदना एकटेपणाची

वेदना एकटेपणाची
एकच डोळा, एकच किडनी, एकच फुफ्फुस
असलेली माणसं जशी अपूर्ण असतात तशी
तशी वेदना एकटेपणाची

धुक्यातला रस्ता
चालता चालता संपून जावा
आणि पायाखालीही यावं धुकंच
ही वेदना एकटेपणाची

गॉगल्स घालून वावरणारी माणसं
कुणाच्याही नजरेचा आधार नाही
मग काय? कबूतरांना दाणे घालता घालता टाकायची वाटून, वेदना
वेदना एकटेपणाची

आल्हाद
१.१८ AM
१९ नोव्हें ०९