तो मंद शुक्रतारा, अन' मंद मंद वारा
एक नाव शोधे, तो स्थिर किनारा
घेत हेलकावे, ती पुढे पुढे चाले,
कधी जोर येई वेगा, कधी मंद मंद डोले.
वाट शोधते ती, शिडात भरून वारा,
एक नाव शोधे..
वारा असाच वाहे, येई उधाण वाटे,
तेव्हा लाट सागराची, तीही भयाण वाटे,
डोक्यावरी नभाचा, एकुलता निवारा.
एक नाव शोधे...
मनी एक ध्यास तिच्या, मिळवीन मी किनारा,
अपयशास मी माझ्या, देणार नाही थारा
हसो जरी मजवरती, कुणी मोठा शिकारा
एक नाव शोधे...