आम्ही कोणती इंग्रजी शिकावी ?

दक्षिण कोरिया :-

"आय ऍम सॉरी, बट आय कांट अंडरस्टँड युवर इंग्लिश" हे वाक्य ऐकून मला फार वाईट वाटतं. भारतात असताना, आपलं इंग्रजी इतरांपेक्षा चांगलं आहे (वासरात लंगडी गाय शहाणीप्रमाणे) हे ऐकून "नाही यार" असं खोटच नाही नाही म्हणायचो, पण आता... इथे "अमेरीकन इंग्लिश म्हणजेच इंग्लिश" असा एक समज आहे. इथे अमेरिकेप्रमाणे विद्यापीठीय पुर्वपरीक्षेसाठी किमान टोईक  आवश्यक आहे. इथे शाळेत शिकवतांनासुद्धा "नेटिव्ह स्पीकर" इंग्रजी शिकणारा असावा असा आग्रह असतो. इतकं करूनही त्यांचं इंग्रजी (संभाषण) कच्चंच असतं हा भाग निराळा.

मात्र इथल्या एका शिक्षणतज्ञाचं मत आहे की कोरीयन विद्यार्थांनी "भारतीय इंग्रजी" शिकावं.  

भारत :-

प्रदेश बदलला की भाषा बदलते अन तिथली इंग्रजीसुद्धा. मग भारतीय इंग्रजी म्हणजे कोणती ?

मी एका अमेरीकन विद्यार्थ्याशी याबाबतीत बोललो. तो म्हणाला, "जर मी तुमची भाषा माझ्या पद्धतीने बोललो तर तुम्हाला चालेल का ?" मग ब्रिटीशांनी इंग्रजीबद्दल असं खपवून का घ्यावं? "

अर्थात अमेरिकनांनी इंग्रजीचे 'हाल' केले ते वेगळंच म्हणा.

आता प्रश्न आहे, आम्ही कोणती इंग्रजी शिकावी.

लहानपणी भारतीय, मग 'ग्रामर' म्हणून ब्रिटिश, पुढे परदेशात जयाचं असेल किंवा बिपिओ, कॉल-सेंटरवगैरे साठी 'त्या-त्या देशाची' उदा. अमेरिकन, ऑस्ट्रेलियन, वगैरे....

त्यात आधी वाचणे - लिहिणे ( A, B, C, .....), पुढे जमलंच तर बोलणे (जे शिक्षकांनाच जमत नाही तिथे विद्यार्थ्यांची काय कथा) आणि सगळ्यात शेवटी नोकरीत वगैरे जमलं तर 'श्रवण' करणे, ह्या LSRW च्या साध्या नियमाच्या अगदी विरुद्ध पद्धतीने शिकतो...

तुम्हाला काय वाटतं? कोणती इंग्रजी शिकावी/ शिकवावी आणि कश्या पद्धतीने ?

अवांतर :- मी विदर्भातील  एका चांगल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेलो होतो. तिथेही ते Reading, Writing आणि जमलं तर (Speaking, Listening) असच शिकवतात. बाकी इंग्रजी शाळांच काय, देव जाणे.