आज मी इतकी आनंदात आहे म्हणून सांगू आणि हा आनंद शेअर करायचा आहे फक्त तुझ्याशीच' गाडीवरून ऑफिसला पोहोचताना तिचा स्वतःशीच संवाद चालू होता. 'नेमकं traffic मध्ये आजच अडकायचं होतं' झूम.......... अजून वेगात एकदाचा रस्ता संपला. घाईघाईत गाडी पार्क करताना रोहित दिसला " हाय रोहित, कसा आहेस ? आज जरा उशीर झालं आहे उद्या बोलू काय?" हुशश... पोचले एकदाची.. कोंप्युटर चालू करून कधी एकदा चॅट वर लॉगइन होतेय असं वाटत असतानाच बॉसची हाक 'मानसी, कालचा review घेऊ या पटकन?' वैतागून तिने सकाळी ज्याला उठल्यावर पहिल्यांदा बघितलं त्याची आठवण काढली आणि चिडचिड करत पण हसत ती cabin मध्ये शिरली....
एकदा केबिन cabin मध्ये गेल्यावर कसला नुसता review , त्यानंतर मिटींग्ज,scheduling सगळं होईपर्यंत त्याचे दोन missed calls आणि तीन मेसेजेस ....... आणि तोपर्यंत झाला lunchtime जेवणातही धड लक्ष लागलं नाही आज तिचं..कसबसं जेवण उरकून कोणाशीही फार न बोलता ती पुन्हा जागेवर आली आणि chat window मध्ये अत्यंत उत्साहात तिने मेसेज टाकला..
तर त्याचा स्टेटस 'lunch' ... 'किती वेळ जेवणार आहे हा आता? कामही सुचत नाहीये आज काही असं काय करतो हा ....' मनातल्या मनात किती चिडली होती ती - स्वतःवर? त्याच्यावर ? की एकंदरीत सगळ्यावरच ?
मानसी - एक अतिशय स्वाभिमानी,हुशार,लाघवी आणि तरीही परखड स्वभावाची मुलगी.घरात सर्वांची लाडकी आणि ऑफिस मध्ये सुद्धा... स्वावलंबी - तिने बारावीनंतरचं शिक्षण स्वतः:च्या खर्चाने केलं होतं. मध्यमवर्गीय, आई वडील दोघेही शिकलेले पण तिने त्यांच्याशी वाद घालून हा हट्ट पूर्ण केला होता. कोणाशीही पटकन मैत्री जमवी अशीच होती ती. स्पष्ट्वक्तेपणा हा आईकडून आलेला त्यामुळे बरेचदा मनस्तापही होत असे तिला... पण अश्विनशी ओळख झाल्यापासून जरा बदल झाला होता खरा....
आणि शेवटी 'कुठे होतीस इतका वेळ ?' असा त्याचा मेसेज पाहिला अन् तिची आतापर्यंतची चिडचिड,थकवा,राग क्षणार्धात गायब ! आत्ता ह्या वेळी किती सुंदर दिसत होती ती आणि नेहमीसारखीच गोड हसत देखील होती.
'अरे काय सांगू ? ...... घरापासून, केबीन मधल्या मिटींगच्या डीटेल्स ते अगदी डब्यात भाजी कोणती होती इथपर्यंत सर्व काही सांगून झाल्यावर म्हणाली," महत्वाचं ते सांगायचं राहिलंच ना अरे पण'
'बोला मॅडम ..." 'आता पुढची १० मिनिटं तरी शांतच बसून राहावं लागणार तर' आशू मनात हसून स्वतःशीच म्हणाला.
'मी सांगितलं होतं तुला आठवतंय? Amateur Singer's workshop साठी ऑडिशन देऊन आले आहे माझ्या आवडत्या संगीतकाराकडे म्हणून'
' अरे, हो रे मी विसरलोच होतो. काय झालं त्याचं? '
'तू असच म्हणणार रे .... तुला कुठे वेळ आहे माझी चौकशी करायला ; )'
'गप्प बस काय आता आणि पटकन सांग काय झालं ते'
'कसा चिडला एक मुलगा हा हा हा.... बरं ऐक - माझं सिलेक्शन झालं, आहेस कुठे सहा महिन्यांचं training आहे मुंबईला. माझं लहानपणापासूनचं स्वप्न पूर्ण होणार आशू, मी खूप आनंदात आहे मी याच संधीची तर वाट बघत होते इतके दिवस... '
'सही यार !!!! तू तर एकदम बाजीच मारलीस. एवढ्या मोठ्या संगीतकाराकडे training ची संधी म्हणजे काय खाऊ नाही. खरं सांगू मला आत्ता काय वाटतंय?
'सांग ना,विचारतोस काय? I am so excited की आत्ता काहीही विचार करायला लावू नकोस'
'मला आत्ता या क्षणी तुला भेटावंसं वाटतंय खू....प'
'Hello बरा आहेस ना? आपलं काय ठरलंय लक्षात आहे ना? जास्त लाडात येऊ नकोस काय'
'अगं हो गं, किती वेळा आठवण करून देशील? मनात जे आलं ते सांगितलं इतकंच एवढं सांगायचा पण हक्क नाही का माझा? जाऊ दे ना, मी बोलतच नाही कसा'
'तसं नाही रे, चिडलास का? चिडू नकोस ना प्लीज सॉरी ना ...'
'हं.... चल नंतर बोलू आता मला meeting ला जायचंय'
'ते ठीक आहे, पण चिडला नाहीस ना? नक्की? '
' मी नाही सांगणार आत्ता, पुन्हा बोलू
'हा ना अस्साच आहे बाबा ..................... '
अश्विन- श्रीमंत घरातील एक हुशार आणि मध्ये सर्व काही केलेला एकुलता एक मुलगा. आई,वडील उच्चशिक्षित. स्वभावाने जरा बेफिकीर,थोडा गर्विष्ठ, पण मनाने चांगला. मित्र, मैत्रिणी खूप पण खूप जवळचे असे कमी किंवा पैशासाठी जवळ आलेले म्हणून हाच जरा चारहात लांब असतो सर्वांपासून.
- ही आहे नातेसंबंधाची ओळख मानसी आणि अश्विनच्या - पुढे बघूया काय होतंय ते .....
....... क्रमशः