"गुड मॉर्निंग डिअर काल चिडला होतास ना माझ्यावर ? Sorry म्हणाले ना मी ''
'' गुड मॉर्निंग ,छे गं मी कशाला चिडू? बरं ते जाऊ दे, काल दोघेही घाईत होतो. आज सांग सगळं सविस्तर तुझ्या amateur singers workshop बद्दल. मीच किती excited आहे सर्व काही ऐकायला"
"हं, ऐक ' सौरभ केळकर' या आघाडीच्या संगीतकाराची ही कल्पना. होतं कसं की खूप लोकं उत्साहाने गाणं शिकायला सुरुवात करतात- काही लहानपणापासून, काही केवळ छंद म्हणून किंवा आवड म्हणून, पण नंतर रोजच्या रूटीन मध्ये ह्या साठी वेळ नाही मिळत कोणाला म्हणून अशा सर्वांसाठी हे special training. आता सर्वांनाच कशी संधी देणार म्हणून मग - auditions,सिलेक्शन आणि मग निवडक
कलाकारांना album मध्ये गाण्याची संधी ....
" मस्त आहे कल्पना !! तू जेव्हा गेली होतीस ना मुंबईला तेव्हाच मला खात्री होती, की तुझं सिलेक्शन होणारंच तसा मीच होतो म्हणा selection panel मध्ये "
"हो, म्हणे मीच होतो.... तुला काय म्हणायचंय? की तू होतास म्हणून झालं माझं सिलेक्शन?? बास बरं का जरा अतीच होतंय हे असं नाही का वाटत तुला मुला?? आणि तुला काय माहीत रे मी कशी दिसते ते, कधी पाहिलं तरी आहेस का मला?
" चिडतेस काय लगेच जरा गंमत केली इतकंच आणि तुला पाहिलं नसलं म्हणून काय झालं, तुझा आवाज ओळखतो ना मी. कसा अगदी कानात साठवून ठेवला आहे. एक सांग मी म्हणालो यातली एक गोष्ट नक्कीच खरी आहे की नाही?"
" ती कोणती म्हणे ? ''
" तुझा आवाज मी खरंच कानात साठवून ठेवला आहे"
" हं... चालू झालं का तुझं मस्का मारणं... "
"तसं नाही गं, तुला आठवतंय त्या रात्री पहिल्यांदा आपण कित्ती वेळ बोललो होतो फोनवर.. आणि मी हट्ट केला म्हणून तू चक्क गाणं पण गायलं होतंसं"
" गाणं आठवतंय का कोणतं ते? ''
" हो, चांगलंच -'तेरे बिना जिंदगीसे कोई.. ' तुझ्या आवडत्या संगीतकाराचं - आर. डी. बर्मन "
" हं.... मलाही आठवतंय सगळं.. 'आठवणी' हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो नाही? त्यावरच तर जगतो आपण... "
" खरंच गं, आता आपल्या दोघाचंच बघ ना, कधी, कसे, केव्हा एकमेकांच्या आयुष्यात आलो, कधी वाटलं होतं का? आणि आता आपल्यामधल्या आठवणींचं आता एक मोठं गाठोडं झालं आहे"
"हो ना रे मला अजून आठवतंय आपण पहिल्यांदा जेव्हा एकमेकांशी बोललो तेव्हाच्या सर्व काही गोष्टी.... "
" हं...... गेली ही भूतकाळात..
" आहे आहे इथेच आहे बरं"
" तर मी काय म्हणत होतो की आता मात्र एक दिवसही करमत नाही तुझ्याशिवाय मला आणि माझ्याशिवाय तुला. हो ना? की अजून कोणी आहेत खास चैट फ्रेंडस?? "
"हो आहेत की, खू..... प आहेत"
"हं...... "
"ए काय रे पण कुठेतरी काही जळतंय का रे? धूर आल्यासारखा दिसतोय बघ"
"करा अजून चेष्टा करा, गरीब बिचारा सापडलोय छळायला "
"हो गरीब बिचारा म्हणे .... "
"हा हा .. ए चल पळतो गं जीमला जायचंय मला बाय..."
मानसी आणि अश्विन दोघेही कुठे,कधी, केव्हा भेटले, त्यांची ओळख कशी झाली हे सगळं पुढच्या भागात ............