मासे आणि मी

गाण्याचे षौकीन लोक एकदा का भेटले, की मग त्यांच्या अश्या गप्पा सुरू
होतात कि विचारू नका, ऐकणाऱ्यांची अवस्था बिकट होते.वेगवेगळ्या गायक -
गायिकांची गाणी त्यांच्याभोवती फेर धरून नाचू लागतात आणि एखाद अगदी आवडणार
पण कमी ऐकलेल गाण आठवून काळजात कळ येते....अट्टल खाणाऱ्यांची अगदी अश्शीच
अवस्था करून सोडत, गोपाळकॄष्ण भोबे यांच पुस्तक मासे आणि मी.
भोबे हे
स्वत: कलाकार होतेच, पण त्याचबरोबर ते कलेची जाण असणारे एक उत्तम
कला-आस्वादक होते. त्यांच्या ह्या गुणांमुळेच कलाकार आणि रसिकजन
ह्यांच्यात ते प्रिय होते. विविध कलांवर प्रेम करणार्या भोब्यंचा एक नवाच
पैलू, कवयित्री शिरिष पैंना कळला. तो म्हणजे मासळीवरचे त्यांचे नितांत
प्रेम. नेहमी प्रमाणेच रंगलेल्या एका मैफ़िलीत, कुणीतरी हॉटेल मधील
मासळीच्या आमटीची आठवण काढली आणि आनि एक नवीनच दालन शिरिषताईंसमोर उघडले
गेले. भोबे एखाद्या कुशल गॄहिणीप्रमाणे ती पाक-क्रिया रंगवून सांगू लागले.
मग ह्याच विषयावर गप्पा रंगल्या आणि शिरिष पैन्ना हा नवीनच कोपरा
उलगडला,आणि त्यांनी मागे लागून लागून भोब्यांकडून त्या वर लिखाण करून घेतल
आणि आनंदाची गोष्ट म्हणजे ते छापल गेल.
हे मत्स्य पुराण अनेक अर्थान
वेगळ आहे. अस्सल खवैय्याला खाल्ल्याची अनुभुती देइल एवढि ताकद त्या लिखणात
आहे. मासळी खाउ हे वाचून उसासे सोडतील, तर अन्य खवैय्ये केवळ ट्राय करायला
पाहिजे म्हनून थेट हॉटेल मध्ये अथवा मित्राकडे मोर्चा वळवतील.
माशांच्या,
त्याहीपेक्षा सी-फ़ूड ह्या व्याख्येत बसणाऱ्या विविध जाती, मासे, कुर्ल्या,
तिसऱ्या, शिनाण्या, ह्या सर्वांचे रसभरीत आणि चवदार वर्णन भोब्यांनी ह्या
पुस्तकात केले आहे. अगदी सुरुवातीलाच भोबे आपल्याला त्यांचे बालपण ज्या
गावात गेले, त्य गावी घेऊन जातात आणि केगदि वेळेशी आपली ओळख करून देतात.
वेळ म्हणजे चौपाटि हे आपल्याला त्यांच्याकडून कळते. मग गावातील
गप्पीष्टांच्या सोबतीत आपण कधी रमतो आणि त्या रसाळ गप्पात कधी हरवून जातो
तेच कळत नाही.गावातील जीवनची तोंडओळख करून देत, मोसमानुसार येणाऱ्या
मासळीशी परिचय करून देत, ही रसदार चवदार यात्रा होते.ह्या यात्रेत भोबे
आपल्याला असले रंगवतात, कि आपण त्यांच्याबरोबर बाबुराय भौंसुले आणि पावलू
कॄझ ह्यांच्या भांडणात रंगतो, जुवांव बरोबर समुद्राची नवलाइ ऐकण्यात रमतो,
हरिचेनच्या घरी जाळ विणीत बसतो आणि दायच्या गप्पा ऐकतो.
ह्या सगळ्याहून
वेगळ अस ह्या पुस्तकाच वैशिष्ट्य म्हंजे मासळी बनवण्याच्या सरस पाक-कॄती.
अगदि साध्या सरळ सोप्या पाक-कॄती वाचतानाच वाचकाच्या जीभेवर लाळेचा लोट
उठतो. हॉटेलमध्ये खाल्ल्या जाणाऱ्या मसालेदार आहारपासून वेगळ्या अश्या
ह्या पाककॄती ट्राय करायला हरकत नाही. गोवेकरी जेवणाचे छोटे गाइड अस म्हणा
हव तर.
तर अस हे रसाळ, चवदार आणि रुचकर पुस्तक तुम्हाला वचायला मिलो,
आणि त्यातील पाककॄती तुमच्या उदरी जावोत ही प्रार्थना करून ह्या मत्स्य
पुराणाच माझ रसग्रहण संपवितो.