पिवळा केशरी लाल,
तुझा गुलाल,
दिगंतावरती.
उंच उधळले पक्षी,
जाहली नक्षी,
अंबरावरती.
मातीचे फुटले पाय,
रोडली गाय,
तापली धरती.
ग्रीष्मात जळाले रान,
पोरके श्वान,
उपाशी फिरती.
भुकेतच होई अंत,
तुला न खंत,
वेदना कळती ?
पारोसा तूही देऊळी,
एकही कळी,
तुझ्या न पुढती.
होतील कधी हे शुभ्र,
सुनील अभ्र,
लागेल झरती,
पुन्हा वाजवूनी पावा,
नदीला देवा,
आण तू भरती.
पुन्हा वाजवूनी पावा, नदीला देवा, आण तू भरती ................