कधी कधी

कधी कधी एकट्यानेच चालवं
स्वत:सोबत ही कधी तरी जगावं,
नेहमीच उमलायचा शिरस्ता सोडून
कधी कधी कोशातसुद्धा राहावं....

एकटेपणाही असतो खूप बोलका
आणि मौनाचे ही हजार अर्थ शोधावे कधी,
या एकाकी क्षणांना सोबत घेऊन
आठवणींच्या देशात ही कधी कधी भटकावं....

एकांतात सुटतात कधी काही कोडी
शोध ही कधी लागतो आपल्यातल्याच 'मी' चा,
असाच एक रंग शोधण्यासाठी कधी
आयुष्य ही बेरंगी करायला हवं....