पुण्यात खडकवासला धरण (प्रेमी जोडप्यांचा 'खास' प्रदेश )
परिसरात एकदा राष्ट्रपती भेटी निमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त होता
त्यावेळेस त्यानी अनेक युगुलाना पकडले, समज दिली
पालकाना बोलवुन घेतले वगैरे , त्यातिलच एका जोडप्याची
उडालेली धांदल मांडत आहे...
प्रेमी युगुलाची गम्मत - भाग-१ ~~
पुन्हा पुण्यातील थंड दुपार
मन माझे वळवळते फार
मत्रिणीस प्रिय मग मी पुसे
येतेस का ग ! मज संगे
दुचाकी ही घेउ
फिरून दूरवर येउ
थंड बघ अशी ही हवा
भोवती धुंद गारवा
रेलून थोडी बैस जरा
दुर्लक्षून जळत्या नजरा
स्वार होऊया हवेवरी
मज्जा करू 'वरचेवरी' !
ऐकून ते इमले माझे
लकाकले डोळे तिचे
खुलल्या मग स्मित कळ्या
मजला ही फुटती उकळ्या
सरता मागे पुण्यनगरी
तन घेइ भरारी नभावरी
'शिवाशिवी' मग होइ सुरू
काय करू अन काय, न करु !
अथांग पाणी धरणाचे
त्यात भिजावे तिज वाटे
गर्दी असते फार इथे
जागा दुसरी शोधू तिथे
एकांती एक झुडुप दिसे
आजुबाजुस कोणीही नसे
शिरलो आम्ही अंधारात
निसर्गाचे किती 'वरदान' !
झुळुक येता वऱ्याची
बट उडते गालावरची
बांधून ती त्यास घेई
पाहून मी हरखून जाई
काही करावे जाणले
अवसान 'उसने' आणले
डोळ्यात खोल पाहिले
लज्जित थोडे जाहले
मन घेई भरारी स्वर्गावरी
तोच 'शिट्टी' कानावरी
लाट 'ऊंचावर' फुटे !!
'मामा' आज इकडे कुठे ?
-------पुढे (भाग -२)