नाडीग्रंथांवरील कार्यशाळेच्या निमित्ताने

नाडीग्रंथांवर कार्यशाळेच्या निमित्ताने   
या विषयावर दि. २४ ते २६ जानेवारी २०१०रोजी
एक कार्यशाळा पुण्यात आयोजित केली आहे.  काहीं इंडॉलॉजीकल संस्थांमधून या विषयाचे
शोधकार्च करायला त्यांना प्रेरित करावे  व याविषयाला ज्योतिषशास्त्रामधील
वादात न गुंतवता या लेखनाचा आस्वाद घ्यावा असे प्रतिपादन करण्याला आधार
मिळवण्यासाठी या कार्यशाळेत अभ्यास केला जाणार आहे.

नाडी भविष्य ताडपत्रावर कोरून लिहिलेले असते. त्याची भाषा तमिळ असते.
ताडपत्रवर कोरून लिहिण्याची प्रथा आता अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहे.
ताडपत्रे फारच जीर्ण झाल्याने त्यांची डिजिटल पद्धतीने राखण करून त्यातील
मजकुराचा अर्थ तज्ञांकडून माहित करून घेण्याचे कार्य अनेक इंडॉलॉजीकल
संस्थांतून केले जाते. त्यासाठी भारत सरकार तर्फे नॅशनल मिशन फॉर
मॅन्युस्क्रिप्ट्स. डिपार्टमेंट ऑफ कल्चर - मिनिस्ट्री ऑफ टुरिझम अँड
कल्चरतर्फे बरेच धन उपलब्ध करु दिले जाते. पहा दुवा क्र. १ त्याशिवाय युनेस्कोच्यातर्फे ही अपार धन विविध शोधसंस्थांना उपलब्ध करुन दिले जातो.
तमिळ भाषेतील अशा ताडपत्रावरील विचारधनाला संरक्षण व संग्रहित करण्याचे
काम चेन्नई येथील इन्स्टीट्यूट ऑफ एशियन स्टडीज या संस्थेला आणि
इन्स्टीट्यूट ऑफ पांडेचरी यांना सोपवल गेले आहे. त्या दोन्ही शोध
संस्थांना मी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्या कार्याची ओळख करुन घेतली.
त्यांचे काम अत्यंत प्रभावीपणे चालू होते. त्यापैकी चेन्नईच्या संस्थेचे
संचालक डॉ. जी. जॉन सॅम्युएल आणि त्यांच्या सोबत तमिळ ताडपत्रावर काम करून
पीएच डी मिळवणाऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ श्रीमती लक्ष्मी यांनी
पुण्यात १४ ऑक्टोबर २००७ला उद्यानप्रसाद कार्यालयात झालेल्या नाडी
भविष्यावरील पहिल्या अधिवेशनाला अनुक्रमे अध्यक्ष आणि मुख्य अतिथि म्हणून
स्थान भूषवले.
डॉ. जी जॉन सॅम्युएल यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात असा आवर्जून उल्लेख
केला की नाडी भविष्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांची उत्सुकता आणि
जागरूकता पाहून मला याचे आश्चर्य वाटते की माझ्यासाऱ्ख्या तमिळ भाषातज्ञ व
जाणकार म्हणवून घेणाऱ्याला अजूनही या विषयावरील ताडपट्ट्यावर शोधकार्य
करायला कसे सुचले नाही? मी नुकताच जपानहून आलेल्या एक शिष्ठमंडळाला घेऊन
विविध नाडी भविष्य केंद्रातून भविष्य कसे असते याचे मार्गदर्शन करुन आलो.
तथापि या ताडपट्टया काही लोकांच्या व्यक्तिगत संपत्तीचा भाग असल्यामुळे या
विषयाला त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आमच्याकडे अशी एकही
ताडपट्टी नाही की ज्यावरून आम्ही यावर काही शोधकार्य करू शकू. विंग कमांडर
शशिकांत ओकांनी अशी ताडपत्रे उपलब्ध करून दिली तर माझी संस्था यावर आणखी
काम करेल, याचे आश्वासन मी आपणासमक्ष देतो. या शिवाय सांगायला आनंद वाटतो
की एका अर्थाने या कार्याची सुरवात विंग कमांडर शशिकांत ओकांनी त्याच्या
आधीच्या भेटीत आम्हाला दिलेल्या काही नाडी पट्टीतील भविष्य कथनाच्या
वह्यांच्या झेरॉक्सनी झालेली आहे. त्यांनी विनंती केल्यावरून विशेषतः डॉ.
लक्ष्मींच्या उत्साही सहकार्यामुळे नाडी भविष्यातील शंभर शब्दांची एक
सॅम्पल डिक्शनरी - नमुना शब्दकोश – मी त्यांना अर्पण करतो. इच्छुकांना या
अधिवेशनाचा संपूर्ण अहवाल व फोटो अल्बम दुवा क्र. २ यावर न्यूज इव्हेंट्स मधे पहाता येतील.
यावेळी अनेकांच्या विनंतीवरून डॉ.लक्ष्मींना मी माझ्या मराठी आणि हिंदी
पुस्तकातील दोन नाडीपट्ट्यांच्या रंगीत फोटोमधील मजकूर वाचून सांगावा अशी
विनंती केली त्यावेळी त्यांनी त्या दोन्ही फोटोमधे च किंवा श, ची किंवा
शी, का, इन, त ही अक्षरे कुठे व कशी आहेत हे काही उपस्थितांसमोर दाखवले व
सर्वांचे समाधान केले.
नाडी भविष्याची मस्करी वा तुच्छतापुर्ण हेटाळणी करून या विषयाला
अनुल्लेखाने टाळणे ही शक्य आहे. किंवा यावर आणखी बरेच अभ्यासकार्य करता
येणे शक्य आहे. ते कसे करावे या संबंधी सकारात्मक विचार वा कृती कोणी या
माध्यमातून करु इच्छित असेल तर त्यांचे सहकार्य घ्यायला मला कधीच संकोच
वाटणार नाही. विरोधांच्या समाधानासाठी भले एक वेळ आपण असे मानू की या
ताडपट्टयांमधून भविष्य वगैरे काहीही लिहिलेले नसते. त्यावर जो काही मजकूर
लिहिलेला असतो त्याचा भविष्यकथनाशी संबंध नसतो. पण ज्या अर्थी त्या
पट्ट्या तमिळ लोकांना वाचायला येतात त्या अर्थी त्यातील भाषा तमिळसदृष्य
असावी. त्या त्यांच्या ताडपत्रावरील कष्टपुर्वक कोरीव कामाची निदान नोंद
घ्याल. बऱ्याचदा आपण निरर्थक आलेली पत्रे वाचतो व फाडून फेकून देतो. का तर
भले मला त्यातील मजकूर महत्वाचा वाटला नसेल तरीही ज्याने तो लिहून तयार
करण्याचे कष्ट घेतले त्याच्या कष्टांची दाद म्हणून आपण नजर फिरवतो. इथे तर
कित्येकांची आयुष्ये घडली असे अनुभव लोक सांगतात.
आपणापैकी कित्येक परदेशात उच्चपदे विभूषित करता. आपणासारख्यांच्या तेथील
विविध विश्वविद्यालयात भारतीय भाषांवरकाम करणाऱ्या तज्ञांच्या ओळखी असतील.
परदेशातून मुद्दाम येऊन नाडी ताडपट्टयांचे नमुने घेऊन त्यांचे कार्बन १४
कसोटीचे काम केले जाते. मग आपण फक्त या साहित्याला माझ्या विचारधारेशी
मिळत नाहीत म्हणून सावत्रपणाची वागणूक देणे योग्य आहे काय? याचा विचार
व्हावा. नाडी भविष्य हे थोतांड आहे म्हणून प्राणपणाने लढू इच्छणाऱ्यांनीही
नाडी ग्रंथ भविष्य हे थोतांड नक्की नाही असे म्हणणाऱ्यांशी वैचारिक मतभेद
बाजूला सारून एकत्र येऊन हे काय आहे? याचा सर्वांसाठी / मानवतेसाठी काही
उपयोग होऊ शकतो का? याचा विचार करायला हरकत नसावी.

तुम्ही आलात तर तुमच्या सोबत नाही आलात तर तुमच्या विना कार्य चालू
ठेवायला हरकत नसावी. ठीक आहे मदत करू नका. निदान आघात करून काम
करणाऱ्यांना नामोहरम करू नका. ते तरी तुमच्या हातात आहे?
नाडी पट्टीतील शशिकांत ही अक्षरे कुठे व कशी आहेत याचे प्रात्याक्षिक